देशातील आर्थिक अराजकामुळे मानवी संहार- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

मोदी यांनी वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस आधीच पाडल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. फेब्रुवारीत केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय सांगणार, असा टिमटा सेनेने काढला आहे.

मुंबई- 'बाराबंकी येथील बडागावात राहणार्‍या छोटूलाल या मुलाला आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठीही बँकेने पैसे दिले नाहीत. 
चारशेहून अधिक लोक बँकांच्या रांगेत मरण पावले. दुसरीकडे मोदी हे आभाराचे भाषण हसतमुखाने करीत होते. पंतप्रधानांनी पाडलेला घोषणांचा पाऊस अशा छोटूलालसाठी उपयोगाचा नाही, असे सांगत देशातील आर्थिक अराजक हे मानवी संहाराला आमंत्रण देणारे आहे' अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणावर 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदींच्या भाषणातील अनेक मुद्दे हे यूपीएच्या काळातीलच आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. 
'देशातील आर्थिक अराजक मानवी संहारास आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो.' अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

मोदी हे भाषणात घोषणा करतात की धमक्या देतात अशी चिंता सगळ्यांना लागून राहिली होती. मोदी यांनी वृत्तवाहिन्यांवरून एकप्रकारे अर्थसंकल्पातील घोषणांचा पाऊस आधीच पाडल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांचा भार हलका केला. फेब्रुवारीत केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री नवे काय सांगणार, असा टिमटा सेनेने काढला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे की, मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून देशाच्या अर्थव्यवस्थेला चूड लावली. या निर्णयामुळे सामान्य जनतेचे, मोलमजुरी करून जगणार्‍यांचे कंबरडे मोडले. पंतप्रधान मोदी यांच्यावर आमचा लोभ आहे व राहणारच, पण देशातील आर्थिक अराजक मानवी संहाराला आमंत्रण देणार असेल तर देश वाचविण्यासाठी सत्य सांगणे हा अपराध नसून राष्ट्रभक्तीच आहे असे आम्ही मानतो, असे शिवसेनेने म्हटले आहे.  
 

महाराष्ट्र

मुंबई : परभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांच्या वाढदिवसाचे पत्र केवळ नावातील साधर्म्यामुळे अनावधानाने रा. ग. जाधव यांना गेले...

07.00 PM

पुणे : मागील वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना चक्क राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी...

01.39 PM

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्नीकडून गैरवापर मुंबई: राज्य सरकारच्या सह्याद्री राज्य अतिथिगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट...

10.06 AM