माझा लढा सर्व शिवसैनिकांना समर्पित; एकनाथ शिंदेंचं नवं ट्वीट

Eknath Shinde latest political News
Eknath Shinde latest political NewsSakal

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. १२ बंडखोर आमदारांना निलंबित करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आसताना, आसाममधील गुवाहाटीत असलेले बंडखोर आमदारांच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. त्यांनी मविआच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे म्हटले आहे. (eknath shinde on mva govt amide maharashtra political crisis)

यापूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी आम्ही आजही शिवसेनेत (Shivsena) आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. असं भासवलं जात आहे. महाराष्ट्रात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे असे सांगितले होते . शिवसेनेचे बंडखोर नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये ते बोलत होते. दरम्यान त्यांनी शिवसेनेला मविआमधून बाहेर पडण्याबाबत नेत्यांशी चर्चा केली होती असे देखील सांगितले होते. यानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांन भावनिक आवाहन करत मविआवर निशाणा साधला आहे.

Eknath Shinde latest political News
Maharashtra Politics : सेना भवनात उद्धव ठाकरेंनी थेट बापच काढला

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित.... आपला एकनाथ संभाजी शिंदे. यावेळी त्यांनी #MiShivsainik हा हॅशटॅग वापरला आहे, दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबईतील परिस्थिती सध्या ठीक नाही असे सांगितले होते. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था ठिक असल्याशिवाय मुंबईत येणार नाही असे केसकरांनी यावेळी सांगितलं होतं.

Eknath Shinde latest political News
आमदारांसाठी खर्च कोण करतंय; केसरकर म्हणाले, पगार...

दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि स्वत:ला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सैनिक म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे यांच्यात कोणाचा पक्ष सत्तेत असेल यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सत्ता मिळवणारे उद्धव नव्हे तर आपण खरे शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. यामुळे आता नेमकं राज्यात सत्तेत कोण राहतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com