आज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)

टीम ई सकाळ
बुधवार, 14 जून 2017

राज्यभरात घडलेल्या विविध घडामोडींचा व्हिडिओजच्या माध्यमातून घेतलेला आढावा -

दिवसभरातील राज्यातील विविध घडामोडी संबंधीत व्हिडिओ बुलेटिन

अकरावीची प्रवेश प्रक्रिया
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती देताना शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर.

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परिक्षेत यश 
रात्रशाळेत शिकून परिक्षा देणाऱ्या रात्रशाळेतील दहावी पास 'मासूम' विद्यार्थ्यांशी संवाद...

दहावीत 100 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनींशी गप्पा
SSC परीक्षेत 100 टक्के गुण मिळवलेल्या पुण्यातील मृण्मयी प्रसाद चितळे (DES सेकंडरी स्कूल), रश्मी सागर दाते (सेवासदन इंग्लिश मीडियम स्कूल), साक्षी महेश जोशी (अहिल्यादेवी हायस्कूल) यांच्याशी संवाद.

जातीचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात पालकांची गर्दी
पिंपरी- दहावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर जातीचे दाखले काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात पालकांची झालेली गर्दी. (व्हिडिओ- अरुण गायकवाड)

कोल्हापुरात शिवसेनेने प्रदुषण मंडळाच्या दारात कचरा टाकला
कोल्हापुर शहरातील कचऱ्यासंदर्भात बुधवारी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदुषण मंडळाच्या दारात कचरा विस्कटुन आंदोलन करण्यात आले.(व्हिडिओ :बीडीचेचर)