राज्यभरात शेतकऱ्यांचा 'महाराष्ट्र बंद' (व्हिडिओ)

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी शेतकरी संघटनांनी वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन केले. 

शेतकऱ्यांनी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली असली, तरीही डबेवाल्यांना मात्र आपले काम बंद ठेवता येत नाही. पण काम चालूच ठेवताना त्यांनी काळी फित लावून शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चप्पल लाईन परिसरात दुकाने बंद करण्यास भाग पाडले. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

नांदेडमध्ये मुखेड तालुक्‍यातील जांब येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

अकोल्यात व्याळा, घुसर, वाडेगाव येथे 'रास्ता रोको' आंदोलन झाले. व्याळा येथे शेतकरी जागर मंच आणि इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांसह 200 शेतकऱ्यांना अटक. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून दुधाचे सात टॅंकर मुंबईकडे रवाना झाले. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

हिंगोलीमध्ये 'महाराष्ट्र बंद'ला प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केले. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

मानवतमधील महाराणा प्रताप चौकात शेतकरी नेत्यांनी सभा घेऊन संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

बारामती-इंदापूर राज्यमार्गावर शेतकऱ्यांनी राडा घातला. भाजीपाल्याच्या गाड्या अडवून त्यातील शेतमाल रस्त्यावर फेकून देण्यात आला. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला सुरवात झाली. 'सरकारला शेतकऱ्यांचे काहीही घेणे-देणे नाही', अशी टीका यावेळी करण्यात आली. व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.