आत्महत्येचा इशारा देणाऱ्यांची मंत्रालयासमोर यादी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 जानेवारी 2017

मुंबई - काम होत नाही, अनुदान मिळत नाही, मंत्रालयात फाइल अडकली, अशा अनेक कारणांमुळे मंत्रालयासमोर आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याचा इशारा दिला जातो. मंत्रालयासमोर होणाऱ्या आत्महत्या; आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच अशा व्यक्तींची यादी लावली आहे. 

मुंबई - काम होत नाही, अनुदान मिळत नाही, मंत्रालयात फाइल अडकली, अशा अनेक कारणांमुळे मंत्रालयासमोर आत्महत्या किंवा आत्मदहन करण्याचा इशारा दिला जातो. मंत्रालयासमोर होणाऱ्या आत्महत्या; आत्मदहन रोखण्यासाठी मंत्रालयाने अजब कल्पना राबवत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच अशा व्यक्तींची यादी लावली आहे. 

मार्च 2016 मध्ये माधव कदम या शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून विष पिऊन मंत्रालयाबाहेर आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सरकारवर जोरदार टीका झाली होती. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी काळजी घेण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. या घटनेनंतर मंत्रालयाचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांनी आत्महत्या करण्याची शक्‍यता असलेल्यांची माहिती काढण्यास सुरवात केली. आझाद मैदानात आंदोलने करणारे नागरिक मंत्रालयासमोर येऊन गोंधळ घालतात. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांची यादी मंत्रालयातील पोलिसांनी तयार केली आहे. यादीतील कुणीही व्यक्ती मंत्रालय परिसरात दिसली आणि काही शंका आली, तर त्याला ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले जाते, असे मंत्रालय सुरक्षाप्रमुख पोलिस उपायुक्त शांतिलाल भामरे यांनी सांगितले. 

अनेकदा आत्महत्या करण्याच्या हेतूने मंत्रालयात आलेले लोक आम्ही असे काही करणार नाही, असे लिहून देतात. त्यानंतरच त्यांना आत जाण्याची परवानगी दिली जाते, अशी माहितीही त्यांनी दिली. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेल्या यादीत 37 नावे आहेत. त्यातील तिघांनी लिखित स्वरूपात आश्‍वासन दिल्याने त्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. 

मारहाण करणाऱ्या आमदारांवर नजर 
मंत्रालयात येणारे आंदोलक, नागरिक आणि लोकप्रतिनिधींवरही पोलिसांची करडी नजर असेल. मंत्रालयातील कर्मचाऱ्याला एका आमदाराने मारहाण केली होती, असे आरोप असलेल्या आमदारांबाबत विशेष खबरदारी घेतली जाईल. त्यांनी कोणताही गैरप्रकार करू नये, यासाठी खबरदारी म्हणून हे आमदार मंत्रालयात येताच त्यांच्यासोबत चार पोलिस देण्यात येतील.

महाराष्ट्र

मुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनने मंगळवारी (ता. 22)...

12.33 AM

पुणे - अर्धा पावसाळा झाल्यानंतरही निम्मा कोरडा राहिलेल्या महाराष्ट्रात रविवारपासून पुन्हा दमदार पावसाने हजेरी लावली....

सोमवार, 21 ऑगस्ट 2017

धुळे - सुरवातीला संवाद माध्यमातील क्रांती वाटणारा मोबाईल कधी ‘फोर जी’वर गेला अन्‌ मुले त्याच्या आहारी गेली, हे आता...

सोमवार, 21 ऑगस्ट 2017