गडचिरोलीत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टरची सेवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे साहित्य, निवडणूक कर्मचारी व पोलिस यांची अतिदुर्गम भागात ने-आण करण्यासाठी "MI-17' हे दोन हेलिकॉप्टर पुरवण्यात येणार आहेत. 

मुंबई - गडचिरोली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे साहित्य, निवडणूक कर्मचारी व पोलिस यांची अतिदुर्गम भागात ने-आण करण्यासाठी "MI-17' हे दोन हेलिकॉप्टर पुरवण्यात येणार आहेत. 

याबाबतचा शासन निर्णय नुकताच गृह विभागाने प्रसिद्ध केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात 16 आणि 21 फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील काही भाग अतिदुर्गम आहे. बहुतांश भाग उंच टेकड्यांचा आणि जंगलव्याप्त असल्यामुळे तेथे वाहतुकीची साधने अपुरी आहेत. शिवाय या भागांमध्ये नक्षलवादीही सक्रिय आहेत, त्यामुळे या भागांमध्ये 13 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत पोलिस, निवडणूक कर्मचारी आणि निवडणूक साहित्याची ने-आण हेलिकॉप्टरने करण्यात येईल. ही हेलिकॉप्टर केंद्र सरकारकडून भाड्याने घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र

मुंबई - राज्य सरकारच्या विक्रीकर विभागातल्या कामगिरीवर महालेखापालांनी (कॅग) अनेक प्रकरणांत नाराजी व्यक्‍त केलेली असतानाच...

05.03 AM

मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने आज पुन्हा मनाई केली. बैलांना शर्यतीदरम्यान इजा होणार...

03.57 AM

मुंबई - देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती,...

03.03 AM