वीस हजार किमीचे जलमार्ग बांधणार

Nitin-Gadkari
Nitin-Gadkari

गडचिरोली - ‘कोणत्याही देशाच्या विकासासाठी वीज, पाणी, रस्ते, दळणवळणाची साधने आवश्‍यक असतात. दळवळणात दिवसेंदिवस क्रांती होत आहे. आपण आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण केले; पण आता यापुढे मजल मारत देशात जलमार्ग वाहतुकीची सोय करण्याचा मानस आहे. त्यामुळे वीस हजार किमीचे जलमार्ग बांधणार आहेत,’ असे सूतोवाच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतर्फे विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, गडचिरोली हा निसर्गसंपन्न श्रीमंत जिल्हा आहे. मात्र बेरोजगारी, गरिबी यासह विकासात्मक मागासलेपण या प्रमुख समस्या या ठिकाणी आहेत. पुढील काळात वैनगंगेसारख्या मोठ्या नदीच्या माध्यमातून स्वस्त जलवाहतूक सुरू करता येईल का, याची पाहणी केली जाईल. असे प्रकल्प उत्तर भारतातील नद्यांवर सुरू आहेत. नागपुरातील तलावांवर उतरू शकेल, अशी विमाने उपलब्ध करायची असून, त्यासाठी विमान तयार करणार असल्याचेही गडकरी म्हणाले; तसेच पाणी व जमिनीवर प्रवास करू शकणारी उभयचर (ॲम्फीबियन) बस घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

कुठल्याही जिल्ह्याचा विकास हा शिक्षण, उद्योग व शेतीच्या विकासावर अवलंबून असतो. तरुणांच्या हाती केवळ पदव्या आल्याने कुठल्याही जिल्ह्याचा विकास होत नाही; तर त्या पदव्या प्राप्त केल्यानंतर मिळालेल्या शिक्षणाचा समाज व जिल्ह्याच्या विकासासाठी कसा उपयोग होतो, यावर विकास अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्‍यकता आहे.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com