मुक्‍ता टिळक यांचा राजीनामा घ्या - विखे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - भारतीय जनता पक्ष आरक्षणाच्या धोरणाचे समर्थन करत असेल, तर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी आरक्षणाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात तातडीने त्यांचा राजीनामा भाजपने घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी केली. 

"ब्राह्मण समाजाला आरक्षण नाही म्हणून ते परदेशात जातात,' हे मुक्‍ता टिळक यांचे विधान वर्ण वर्चस्वातून करण्यात आले आहे. मनुवादाचे समर्थन करणारी ही मानसिकता असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. समाजातील मागास घटकांना राज्यघटनेने आरक्षण दिले आहे. त्यामुळे पुण्याच्या महापौरांचे हे विधान घटनाविरोधी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने धनगर, मराठा आरक्षणाचा मुद्दा वापरला; परंतु आता येणारी विधाने पाहता भाजपला आरक्षण नकोच असल्याचे दिसून येते. आरक्षणाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट असेल तर पुण्याच्या महापौरांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे; अन्यथा त्यांच्या आरक्षणविरोधी धोरणावर शिक्कामोर्तबच होईल, असे विखे पाटील म्हणाले.