कुस्तीगिरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

मुंबई - महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील मल्लांनी जगभर नावलौकिक मिळवला आहे. यामुळे कुस्तीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, पहिलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

दीनानाथ सिंह यांनी पहिलवानांना वाढीव पेन्शन मिळावी, एसटीचा प्रवास मोफत मिळावा, शासकीय विश्रामगृहात सोय व्हावी, वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, अशा मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीन वेळा महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी पहिलवानांना पोलिस उपनिरीक्षकऐवजी पोलिस उपअधीक्षक करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पहिलवानांच्या कुटुंब निवृत्तीबाबत क्रीडा विभागाने आराखडा तयार करावा. पेन्शनसाठी वयाची अट न टाकता प्रस्ताव तयार करावा. पहिलवानांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. 

Web Title: Governance positive about the demands of wrestlers