फ्लिपकार्टवर सरकारने बंदी घालावी - विखे पाटील 

फ्लिपकार्टवर सरकारने बंदी घालावी - विखे पाटील 

मुंबई - ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर घातक शस्त्रांची विक्री होत असल्याचे औरंगाबाद शहरात नुकत्याच सापडलेल्या शस्त्रसाठ्यांवरून स्पष्ट झाले. फ्लिपकार्टवर सरकारने तातडीने बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. 

औरंगाबाद शहरात झालेल्या दंगलीनंतर शहर हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच फ्लिपकार्ट या ऑनलाइन वेबसाइटवरून तलवारी, चाकू, गुप्ती, कुकरी, जांबिया अशी सुमारे 28 शस्त्रांची खरेदी करण्यात आल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना वेळीच याचा सुगावा लागला व पुढचा अनर्थ टळला असला तरी अशा प्रकारे खुलेआम शस्त्र खरेदी- विक्रीचे व्यवहार होत असतील तर ते घातक आहे. त्यामुळे ऑनलाइन शस्त्रविक्री करणाऱ्या वेबसाइट्‌सवर सरकारने तातडीने बंदी घालण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com