अपंग मुलीवर बलात्कार करून अॅट्रॉसिटीची धमकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 सप्टेंबर 2016

पाथर्डी : तालुक्‍यातील मोहरी येथे पंधरा वर्षांच्या अपंग, मूकबधिर अल्पवयीन मुलीवर गावातीलच अशोक सदाशिव वाल्हेकर (वय 56) याने बलात्कार केला. मुलीच्या घरात आज दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. वाल्हेकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, घटनेनंतर फिर्याद दाखल करण्यास निघालेल्या मुलीच्या नातेवाइकांना वाल्हेकर याच्या नातेवाइकांनी ‘ऍट्रॉसिटी‘ कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने गावात तणाव निर्माण झाला. अशोक वाल्हेकर मातंग समाजातील असून, त्याला आठ मुली व एक मुलगा आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

अपंग असलेली ही मुलगी गरीब कुटुंबातील आहे. ती आपल्या आई-वडिलांसोबत गावात राहते. आई तिच्या बहिणीच्या बाळंतपणासाठी दवाखान्यात गेली होती. वडील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. भाऊ मित्रासोबत खेळायला गेला होता. 

मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून वाल्हेकर याने तिच्या घरात जाऊन बलात्कार केला. मुलीचा लहान भाऊ तेथे आल्यावर त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे जमाव जमून त्यांनी वाल्हेकरच्या कुटुंबीयांना ही कल्पना दिली. मुलीचे नातेवाईक पोलिस ठाण्याकडे तक्रार देण्यास निघाले असता वाल्हेकरच्या नातेवाइकांनी, "आम्ही मागासवर्गीय आहोत. आमच्यावर केस केल्यास ‘ऍट्रॉसिटी‘अन्वये गुन्हा नोंदवू", अशी धमकी दिली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिसांनी वाल्हेकर याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. "ऍट्रॉसिटी‘ची धमकी दिल्यामुळे तेथे तालुक्‍यातून अनेक युवक जमा झाले. पोलिस ठाण्यासमोरही मोठा जमाव जमला. या घटनेचा निषेध करीत, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवकांनी केली. या मागणीसाठी सकल मराठा समाज व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर बैठा सत्याग्रह केला. कार्यकर्त्यांनी पोलिस उपअधीक्षक अभिजित शिवतारे यांची भेट घेतली. ‘चुकीचा गुन्हा दाखल करणार नाही. घडलेल्या प्रकाराबाबत आरोपीस अटक केली असून, कोणावरही अन्याय होणार नाही,‘ असे शिवतारे यांनी सांगितले.