मानव तस्करीचे केंद्र होतेय महाराष्ट्र

Human-Trafficking
Human-Trafficking

नागपूर - दहशतवाद, अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांचा अवैध व्यापार या खालोखाल जगातील सर्वच देशांना भेडसावणारी तिसरी मोठी समस्या आहे ती मानवी तस्करीची. गुन्हेगारीत आघाडीवर असलेला महाराष्ट्र मानवी तस्करीमध्येही देशातील सर्वांत मोठे केंद्र होत असल्याचा निष्कर्ष ‘ह्युमन ट्रॅफिंकिंग’वर काम करणाऱ्या ‘टेस्टा’ (ट्रान्सफॉर्मिंग एक्‍सप्लोयटेशन ॲण्ड सेव्हिंग थ्रू असोसिएशन) या संस्थेने काढला आहे.

भारतात मुले बेपत्ता होण्याची समस्या दरवर्षी अधिक गंभीर आणि जटिल होत आहे. असे असताना राज्यांकडून गांभीर्याने प्रयत्न केले जात नाहीत. ‘बचपन बचाओ’ संघटनेच्या अलीकडच्या अहवालात भारतात प्रत्येक तासाला अकरा मुले बेपत्ता होत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे अकरांपैकी चार मुलांचा शोध कधीच लागत नसल्याचे धक्कादायक वास्तवही निष्कर्षात मांडले आहे.

देशातल्या ६४० पैकी ३९२ जिल्ह्यात २०१६ या वर्षात १ लाख ११ हजार ६६९ मुले बेपत्ता झाल्याचे पोलिसांत दाखल तक्रारींच्या आधारे सांगता येते. प्रत्यक्षात यापेक्षाही अधिक मुले बेपत्ता असल्याचा संघटनेचा दावा आहे. भारतात दरवर्षी ९६ हजार मुले बेपत्ता होतात. त्यातील ४१ हजार ५४६ मुलांचा शोध कधीच लागत नाही. राज्यातही ही संख्या मोठी असून, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ‘ह्युमन ट्रॅफिंकिंग’च्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एनसीआरबीच्या २०१६ च्या अहवालानुसार महाराष्ट्रात वर्षभरात ‘ह्युमन ट्रॅफिंकिंग’ची ६३ प्रकरणे पुढे आली असून लहान मुलांविरोधातील ८ हजार ९०८ गुन्हे समोर आले आहेत.

‘ह्युमन ट्रॅफिंकिंग’ कशासाठी? 
 इतर देशांत गुलामगिरीसाठी विक्री  महिलांचा देहविक्रीसाठी वापर  लहान मुलांची बालकामगार म्हणून विक्री  भीक मागणाऱ्या टोळ्यांकडून व्यवसायासाठी  चाइल्ड पोर्नोग्राफीसाठी इतर देशांत विक्री  अवयवविक्रीसाठी देशभरात विक्री  परप्रांतीय स्त्रियांची वधू म्हणून विक्री.

आकडे बोलतात 
भारतात दरवर्षी - ९६ हजार मुले बेपत्ता  भारतात २०१६ मध्ये १ लाख ११ हजार ६६९ मुले बेपत्ता  ४९ हजार मुले कायमस्वरूपी बेपत्ता  महाराष्ट्रात वर्षभरात ६३ केसेस  नागपुरात २७ तक्रारी दाखल  लहान मुलांविरोधात ८ हजार ९०८ गुन्हे.

‘ह्युमन ट्रॅफिकिंग’मधे मुंबईनंतर नागपूरमध्ये सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर देशांतील ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’ नागपूरमार्गे केले जाते. नागपूरमध्ये मध्य प्रदेश, बांगलादेश, छत्तीसगड, पश्‍चिम बंगाल, ओडिशा येथील महिला/ मुलींची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. २०१५ मध्ये सोळा राज्यांतील सर्वेक्षणात सर्वाधिक ६३ गुन्हे महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. यातील बचाव करण्यात आलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी ‘टेस्टा’ कार्यरत आहे.  
- अनिरुद्ध पाटील, सदस्य, टेस्टा कमिटी, नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com