"मराठी'ची गुणवत्ता सुधारणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

सोलापूर - पहिली ते दहावीच्या प्रथम भाषा मराठी या विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संरचनात्मक बदल करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मराठी या भाषा विषयाची गुणवत्ता सुधारण्यासंदर्भात सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठीच्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असलेले बदल होण्याची शक्‍यता आहे. 

पुणे येथे असलेल्या राज्याच्या विद्या प्राधिकरणाने याबाबत एक एप्रिलला एक पत्र काढले आहे. विद्या प्राधिकरणाचे विभागीय उपसंचालक, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थांचे प्राचार्य, प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना हे पत्र पाठविले आहे. मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संरचनात्मक बदल करण्यासाठी विद्या प्राधिकरणाला चांगल्या शिक्षकांची व अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे हे काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या शिक्षक, विषय सहायक व अधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. या निवडीसाठी विद्या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर "लिंक' उपलब्ध करून दिली आहे. हे काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना आठ एप्रिलपर्यंत या संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करण्याचे आवाहन विद्या प्राधिकरणाच्या वतीने केले आहे. 

"शिक्षणाची वारी' 
सरकारने "शिक्षणाची वारी' हा नवा उपक्रम सुरू केला आहे. त्यातून राज्यातील प्रयोगशील शाळा पुढे येऊ लागल्या आहेत. त्या शाळांमध्ये काम करत असलेल्या शिक्षकांचा उपयोग इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केला जात आहे. पुस्तक हे केवळ विद्यार्थ्यांसाठी आधार असायला हवे, या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. 

Web Title: To improve the quality of Marathi