‘खंडणीखोरांमुळे गुंतवणूक गेली’

महाराष्ट्रात सध्या उद्योजक, व्यापारी यांच्याकडून खंडणी उकळण्याचे उद्योग सुरू आहेत
devendrs fadanvis
devendrs fadanvissakal

कोल्हापूर : ‘‘कोरोनानंतर जगभरातील मोठ्या उद्योगांनी भारतात उद्योग सुरू करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र ही गुंतवणूक महाराष्ट्रात न येता कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान इकडे जात आहे. कारण महाराष्ट्रात सध्या उद्योजक, व्यापारी यांच्याकडून खंडणी उकळण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे एकेकाळी परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज शेवटी गेला आहे,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या संवाद या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम यांच्या प्रचारार्थ आज संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये उद्योजक आणि व्यावसायिक सहभागी झाले होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यात स्थिर सरकार नसल्याचा मोठा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला. कोविडच्या काळात चीनमध्ये जे वातावरण होते. त्यामुळे जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले उत्पादन चीन बरोबरच अन्य ठिकाणीही केले पाहिजे यासाठी शोध सुरू केला. त्यांच्या दृष्टिकोनातून भारत हा यासाठी सर्वाधिक चांगला देश असल्याचे दिसून आले. गेल्या वर्षभरापासून त्यांनी विविध राज्यांमध्ये गुंतवणुकीसाठी शोध सुरू केला. ही परकी गुंतवणूक कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये गेली.’’

‘‘महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे मंत्री खंडणीखोर आहेत. उद्योजक, व्यावसायिक यांच्याकडून खंडणी उकळणे, कामगार भरतीमध्ये हस्तक्षेप करून आपल्या कार्यकर्त्यांच्या भरतीसाठी दबाव टाकणे यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग बाहेर गेले. तसेच परकीय गुंतवणूकही थांबली. कोल्हापूर ही उद्योगाची जननी आहे. डिझेलवरचे इंजिन पहिल्यांदाच इथेच तयार झाले. उद्योग उभारणीचे कोल्हापूर मॉडेल साऱ्या राज्यभर गेले. तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्या. आम्ही इथल्या समस्या नक्की सोडवू,’’ असे फडणवीस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com