जवान चंदू चव्हाणांनी केले आजींचे अस्थिविसर्जन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

नाशिक : सर्जिकल स्ट्राईक नंतर अनवधानाने पाकिस्तानात गेलेल्या व मोठ्या प्रयासाने सुखरूप परतलेला भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या हस्ते आज (रविवारी) नाशिकला रामकुंडात त्यांच्या आजीच्या अस्थिंचे विसर्जन झाले. 

जवान चंदू चव्हाण पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या बातमीच्या धक्‍य्याने त्यांच्या आजीचे निधन झाले होते. पण चंदू हे सुरक्षित भारतात येईपर्यंत त्यांच्या अस्थिचे विसर्जन न करण्याचा निर्णय चंदू चव्हाण यांच्या परिवाराने घेतला होता. 

त्यामुळे पाकिस्तानातून सुखरुप परत आल्यानंतरच आज चंदू यांच्या हस्ते नाशिकच्या रामकुंडात त्यांच्या आजीच्या अस्थीचे विसजन करण्यात आले. 