‘हिजाब’ परिधान केलेल्या महिलेस लोकलमध्ये विरोध

‘हिजाब’ परिधान केल्याने एका मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास काही प्रवाशांनी विरोध केल्याचा प्रकार घडला.
karnataka hijab case Women wearing hijab objection local train mumbai
karnataka hijab case Women wearing hijab objection local train mumbai sakal

मुंबई : कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून देशभरात वादंग सुरू झाला आहे. आता याचे पडसाद मुंबईतही उमटू लागले आहेत. ‘हिजाब’ परिधान केल्याने एका मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास काही प्रवाशांनी विरोध केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १५) घडला. हा सर्व प्रकार संबंधित महिलेच्या पतीने ट्विटरवर शेअर केला आहे.

हिजाब परिधान केलेल्या एका मुस्लिम महिलेला मंगळवारी नालासोपारा- विरारदरम्यान लोकलमध्ये बसण्यासाठी जागा देण्यास काही प्रवाशांनी नकार दिला, उलट साडी नेसलेल्या महिलेला बसण्यास जागा देण्यात आली. याबाबत संबंधित महिलेचे पती डॉ. परवेझ मांडवीवाला यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. यावर अनेक यूजर्संनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी या प्रकारावर ट्विट करून तीव्र नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com