मराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्हीवर रंगणार काव्यमैफल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस अर्थात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून साम टीव्हीने उद्या, रविवारी ( ता. २६ ) कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून या कविसंमेलनाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. श्रीराम यात्रा कंपनी प्रा. लि. हे या कविसंमेलनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

मराठी भाषा दिनानिमित्त साम टीव्ही दोन वर्षांपासून कविसंमेलनाचे आयोजन करते आहे. यंदा या कविसंमेलनाचे तिसरे पर्व आहे. नव्या - जुन्या कवींच्या सर्वोत्तम आणि दर्जेदार कवितांचे सादरीकरण हे या कविसंमेलनाचे वैशिष्ट्य आहे. सलग दोन तास कवितेची मैफिल दाखवणारी साम टीव्ही ही मराठीतील एकमेव वाहिनी ठरली आहे. ज्येष्ठ कवी अशोक बागवे, सतीश सोळांकूरकर, मंगेश विश्वासराव या आधीच्या पिढीतील कवींसोबतच आजच्या पिढीतील तरुण कवी आबेद शेख, संदीप जगताप आणि राधिका फराटे हे या कविसंमेलनात सहभागी होत आहेत. या रंगतदार मैफिलीचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी आणि साम टीव्हीचे वरिष्ठ निर्माता दुर्गेश सोनार यांनी केले आहे.   

महाराष्ट्र

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदा राज्यात...

01.36 PM

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून...

10.48 AM

मुंबई : देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती, देशाला...

08.30 AM