सदाभाऊंचे मंत्रीपद कायम - पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ""पणन व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एखादे मंत्री पद देता येईल,'' असे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची "स्वाभिमानी'तून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे, सरकारने खोत यांचे मंत्रीपद काढून घेण्याची मागणी शेट्टी यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर येथे पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, ""मुख्यमंत्री कोट्यातून सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद दिले आहे. पणन व कृषी राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ खोत यांचे काम चांगले आहे. त्यामुळे त्यांना मंत्री पदावरून हटविता येणार नाही. त्याऐवजी राजू शेट्टी हे सरकारसोबत राहत असतील तर आणखी एखादे मंत्रिपद त्यांना देता येईल.' 

नारायण राणे यांचे स्वागत 
कॉंग्रेसमधील दिग्गज नेते आणि माजी मंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करत असतील तर त्यांचे स्वागत आहे; मात्र, सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरूच आहेत. पण राणे यांच्या प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.