आरोपींना दुचाकीवरून चकरा मारताना पाहिले होते 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

नगर - "तिन्ही आरोपींना 13 तारखेला दुचाकीवरून कुळधरण रस्त्याने चकरा मारताना पाहिले होते,' असे एका साक्षीदाराने आज न्यायालयापुढे सांगितले. कोपर्डी येथे अत्याचार करून अल्पवयीन मुलीचा खून केल्याच्या खटल्यात आरोपींच्या वकिलांनी त्याच्यासह तीन साक्षीदारांची उलटतपासणी आज घेतली. 

विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. या खटल्यात आतापर्यंत 18 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. पुढील सुनावणी आठ ते 10 मार्चदरम्यान होणार आहे. 

आरोपीच्या वकिलांनी आज तीन साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. मोटरसायकल शो-रूम व्यवस्थापकाने दुकानातील नोंदवह्यांच्या सत्यप्रती (झेरॉक्‍स) न्यायालयापुढे सादर केल्या. व्यवस्थापकाने सादर केलेल्या सत्यप्रती पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याची विनंती विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. 

अन्य एका साक्षीदाराला आरोपीच्या वकिलांनी विचारले, ""तुम्ही 13 जुलै रोजी पुण्याला गेला होता. नंतर 16 जुलै रोजी पोलिस ठाण्यात जाऊन साक्ष कशी दिली? खोटी साक्ष देता का?'' त्यावर त्यानेही "नाही' असे सांगितले. 

आरोपींच्या वकिलांचे काही प्रश्‍न संदिग्ध असल्याचे सांगत ऍड. निकम यांनी तोच प्रश्‍न विचारत खुलासा केला. त्यावर साक्षीदाराने सांगितले, ""पुण्यात असताना 15 जुलै रोजी दुपारी चार वाजता गावातील माणसाने सांगितले, की पप्पू शिंदेने बलात्कार करून एका मुलीचा खून केला. त्या वेळी आठवले, की 13 तारखेला शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे यांना दुचाकीवरून कुळधरण रस्त्याने चकरा मारताना पाहिल्याचे मी पत्नीला सांगितले. नंतर कर्जत पोलिसांना कळविले.'' 

ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर यांनी उलटतपासणी घेतली. 

Web Title: kopardi murder case