राज्यात शुक्रवारपर्यंत पावसाची उघडीप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे. 

पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे. 

पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढला आहे. कोकण, मराठवाडा अाणि विदर्भात सर्व ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात तापमान २७ ते ३० अंशांच्या असपास आहे. सोमवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

सोमवारी उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, हे क्षेत्र पुढील दोन दिवस याच भागात स.िक्रय राहणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशाच्या दक्षिण भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील राज्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. ईशान्य भारतातही पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तर, महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाची उघडीप कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

सोमवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २९.४, कोल्हापूर २७.७, महाबळेश्वर २०.०, मालेगाव ३१.२, नाशिक २८.०, सांगली २८.४, सातारा २७.१, सोलापूर ३३.४, मुंबई ३०.२, अलिबाग ३०.१, रत्नागिरी २९.४, डहाणू ३१.०, आैरंगाबाद ३०.९, परभणी ३२.४, नांदेड ३२.५, अकोला ३२.५, अमरावती ३०.८, बुलडाणा ३०.७, चंद्रपूर ३२.४, गोंदिया ३०.८, नागपूर ३१.७, वर्धा ३१.०, यवतमाळ ३०.०. 

Web Title: Low rainfall in the state