‘राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नाही’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याचे सर्व वृत्त निराधार असून, पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही, असा ठाम विश्‍वास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज व्यक्‍त केला. राष्ट्रवादीच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

विरोधी पक्षातले अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून माध्यमांत येत असल्याबाबत त्यांना विचारले असता, राज्यातील विविध समस्यांवरून लक्ष वेधण्याचा हा डाव असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व ४१ आमदार पक्षनिष्ठ असून, कोणताही आमदार पक्षातून बाहेर जाणार नाही. सर्व चर्चा निराधार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार चालढकल करत असताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दहा लाख शेतकरी बनावट असल्याचे अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्याने राष्ट्रवादी निषेध करत असल्याचे ते म्हणाले. सरकारने जे शेतकरी पात्र ठरले आहेत, त्यांना कर्जमाफीची रक्‍कम खात्यावर जमा करण्याची सुरवात करण्याची दानत दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, भारनियमनाने जनता व शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस १ ऑक्‍टोबरपासून आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही तटकरे यांनी वेळी दिला.  

Web Title: maharashtra new ncp sunil tatkare