अनिलने केला लिंगाणा चढाईचा विक्रम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

लिंगाणा हा 3 हजार फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. हा गड फक्त दोरखंडाच्या सहाय्याने पार करता येतो. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून इशान्येस 16 मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक 2 हजार 969 फुट उंच असून त्याची चढण 4 मैल लांबीची आहे. त्याची तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. शिवाजी राजेंनी रायगडजवळ हा किल्ला बांधला.

लिंगाणा हा 3 हजार फूट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. हा गड फक्त दोरखंडाच्या सहाय्याने पार करता येतो. लिंगाच्या आकाराचा हा किल्ला महाडपासून इशान्येस 16 मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे. लिंगाण्याचे खडक 2 हजार 969 फुट उंच असून त्याची चढण 4 मैल लांबीची आहे. त्याची तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे. शिवाजी राजेंनी रायगडजवळ हा किल्ला बांधला. येथे एक गुहा असून, इथल्या गुहेत जे जुने कारागृह होते, त्यामध्ये एका वेळेस 50 कैदी ठेवले जात असत व गडावरील शिडी व दोरखंड कापून ठेवले जात असे. त्या काळानंतर जवळपास 300 वर्ष या ठिकाणी कोणीही फिरकले नव्हते.  

सर्व प्रथम 25 डिसेंबर 1978 रोजी मुंबई हॉलीडे हायकर्सने हिरा पंडीत यांच्या नेतृत्वाखाली लिंगाणा सर केला. या नंतर त्यांचाच एक सदस्य संतोष गुजर यांनी 25 डिसेंबर 1979 रोजी एकट्याने ही कामगिरी सर केली. परंतु खाली उतरत असताना त्यांचा र्दुदैवी मृत्यू झाला. त्यानंतर कोणीही एकट्याने लिंगाणा सर करण्याचे धाडस केले नाही. गुजर यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी दिलीप झुंझारराव यांनी धा़डस करून कोणत्याही साधन सामग्रीचा वापर न करता जानेवारी 2006 मध्ये ही मोहीम यशस्वी केली. त्यानंतर बऱ्याच ट्रेकिंग क्‍लबच्या सदस्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने लिंगाणा सर केला आहे.

असाच एक जिगरबाज अवघ्या 33 वर्षाचा अवलिया अनिल वाघ याने एकट्याने हा लिंगाणा सुळका कोणत्याही साधम सामग्रीचा वापर न करता सर करण्याचे ध्येय मनाशी बाळगले. आतापर्यंत जवळपास 33 वेळा ट्रेकर्सना त्याने यशस्वीपणे लिंगाण्याच्या माथ्यावर पोहोचवले आहे. वय वर्ष 8 ते वय वर्ष 62 या सर्व वयोगटातील लोकांचा यात समावेश होतो. यंदा क्‍लाईंबिंगसाठी 7 जून 2017 रोजी मोहीम फत्ते करण्यासाठी तो निघाला. आदल्या दिवसाशी रात्री त्या भागात भयंकर पाऊस पडत होता व दुसऱ्या दिवशीसुध्दा ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरूच होता. मोहिम त्यामुळे इतक्या दिवसांची केलेली मेहनत वाया जाते की काय अशी त्यांच्या मनात चिंता लागून राहिली. परंतु महाराजांच्या आर्शिवादाने थोडा वेळ पाऊस थांबला व लगेच त्याने सुळका सर करण्याचा निर्णय घेतला व त्या दिशेने दुपारी दी़ड वाजता त्याने वाटचाल सुरू केली.  बघता बघता फक्त 22 मिनिटात तो सुळक्‍याच्या माथ्यावर पोहोचला. महाराजांना नमन करून 4 मिनिटे विश्रांती घेवून त्याने पुन्हा खाली उतरण्यास सुरूवात केली व 23 मिनिटानी तो पायथ्याशी पोहोचला. हा एक प्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल.  

या मोहिमेमध्ये त्याला ऋषीराज मोरे, अश्‍वमेघ, दत्ता काळभोर, महेश धनवट, प्रमोद पाटील, तुषार होले या सर्वांनी सहकार्य केले. पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन, कस्तुर रत्न फाऊंडेशन, तसेच तमाम शेतकरी बंधूंना त्याने ही मोहीम समर्पित केली.