सार्वजनिक बँक कर्मचाऱ्यांचा आज संप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई, - विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बँकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज (मंगळवारी) एकदिवसीय संपाची हाक दिली आहे.

संपामुळे एसबीआय, आयडीबीआय यासारख्या बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमधील नऊ संघटना आणि ऑल इंडिया बॅंक कर्मचारी संघटनेने या संपाला पाठिंबा दिला आहे.

सार्वजनिक बॅंकांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियनमधील नऊ संघटना आणि ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. एसबीआयच्या विलीनीकरणानंतर देशात 20 सरकारी बॅंका असून 56 ग्रामीण बॅंका आहेत. एकूण बॅंकिंग उलाढालीच्या 80 टक्के व्यवसाय या बॅंकांकडे आहे. सार्वजनिक बॅंकांमध्ये जवळपास दहा लाख कर्मचारी आहेत. संपामुळे बहुतांश बॅंकांचे कामकाज ठप्प होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोटाबंदीतील जादा कामाचे मानधन, ग्रॅच्युएटी, पेन्शन,वेतनासंबधीच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकर भरती करण्याची मागणी करण्यात आली आहे. बड्या कॉर्पोरेट कर्जांना निर्लेखित करण्याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. विलीनीकरणातून सरकार बॅंकांचे खासगीकरण करत असल्याचा आरोप यूएफयूबीचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर यांनी केला. संपातून कर्मचाऱ्यांमधील एकजूट दिसेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

खासगी आणि नागरी सहकारी बॅंका सुरू राहणार
सरकारी बॅंकांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने सार्वजनिक शेत्रातील बॅंकांच्या कामकाज प्रभावीत होणार असून धनादेश वटण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मात्र खासगी क्षेत्रातील सर्व बॅंका आणि नागरी सहकारी बॅंकांचे कामकाज मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहील.

महाराष्ट्र

लोहारा : तीन मुलींसह आईचा मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. या चौघींचाही मृत्यू संशयास्पद असून, आत्महत्या की घातपात, याची चर्चा...

08.54 PM

पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत...

03.54 PM

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार...

06.33 AM