प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आज मंत्रालयात त्रिमूर्ती सभागृहात पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान कार्यक्रमात बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांचे निसर्गाशी अतूट नाते आहे. नागरिकांनी निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर ज्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे प्रदूषण वाढते, त्याचा वापर टाळायला हवा. पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल, तर प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एक झाड तरी लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. वर्षभरातील सर्व सण-उत्सव साजरे करताना हवेचे प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.’’ 

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी फटाक्‍यामुळे होणाऱ्या प्रदूषणाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रदूषणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना तावडे त्यांनी उत्तरे दिली. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले, की भावी पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. त्यांच्यावर शाळेतच पर्यावरणाचे रक्षण करण्याचे संस्कार झाले पाहिजे. दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर करू नये. येणारी दिवाळी ही प्रदूषणमुक्त साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.