ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपच "नंबर वन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नाही. मात्र भाजपचे पदाधिकारी गावपातळीवर सरपंचपदाच्या निवडणुकीला उभे राहून बहुमताने जिंकले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष बनला आहे, असा दावा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. 

राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या तीन हजार ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली आहे. प्रदेश भाजपच्या वतीने या संदर्भात काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने जबरदस्त यश मिळविले असून भाजप "नंबर वन' ठरला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला कौल दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी गावकऱ्यांचे आभार मानले व भाजप कार्यकर्त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले. सुमारे दोन हजार ग्रामपंचायतींवर भाजपचे सरपंच निवडून आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

दानवे म्हणाले की, राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपच "नंबर वन' ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या कामगिरीवर राज्यातील ग्रामीण जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. भाजप सरकारच्या विरोधात ग्रामीण भागात वातावरण तापवू पाहणाऱ्या विरोधी पक्षांना मतदारांनी खणखणीत उत्तर दिले आहे. सरपंचांची थेट निवड पहिल्यांदाच होत असून या बदलाला ग्रामीण जनतेने उत्साही प्रतिसाद दिला आहे. 

Web Title: maharashtra news gram panchayat election result BJP TOP