हॉटेल उद्योगांच्या परवान्यांत सुलभता आणावी - मुख्यमंत्री 

हॉटेल उद्योगांच्या परवान्यांत सुलभता आणावी - मुख्यमंत्री 

मुंबई - हॉटेल उद्योगाला लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्याबरोबर त्यामध्ये सुलभता आणण्याबरोबरच मुंबईसारख्या ठिकाणी फूड ट्रक सुरू करण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नॅशनल रेस्टॉरंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांबाबत चर्चा केली. या वेळी खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या. 

हॉटेल उद्योगातून दरवर्षी 35 हजार कोटींची उलाढाल एकट्या मुंबई शहरात होते आणि या माध्यमातून पाच लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. हॉटेलसाठी परवाना घेताना विविध विभागांशी संबंध येतो. यासाठी एक संस्था हवी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली. मुंबई महापालिकेने या संदर्भात परवान्यांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलली असून, जवळपास 29 प्रकारच्या परवानग्या कमी करण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. फूड ट्रॅक ही उत्तम संकल्पना असून, कार्यालये, पर्यटनस्थळे या ठिकाणी गरमागरम खाद्यपदार्थ मिळू शकतील. याकामी स्वयंसाह्यता बचत गटांनादेखील फायदा मिळू शकतो. फूड ट्रकसाठी विशेष धोरण तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी हॉटेल व्यवसायाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com