पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई - पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले आहे. राज्यात 1 हजार 97 पायाभूत सुविधा प्रकल्प असून, या प्रकल्पांची किंमत 5 लाख 97 हजार 319 कोटी आहे. देशातील सर्व राज्यांची 30 एप्रिल 2017 पर्यंतची पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती दर्शवणारी पुस्तिका "निती आयोगा'ने तयार केली असून, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 

या अहवालात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्प (पी.पी.पी.) व सरकारी प्रकल्पांचा समावेश आहे. 5 ते 50 कोटींहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश निती आयोगाने अहवालात केला आहे. 

देशात एकूण 8 हजार 367 पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची किंमत 50 लाख 58 हजार 722 कोटी आहे. त्यात महाराष्ट्राचा सहभाग सर्वांत जास्त म्हणजे 11.8 टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. तिथे 454 पायाभूत सुविधा प्रकल्प असून, त्यांची किंमत 3 लाख 54 हजार 419 कोटी आहे. देशातील एकूण प्रकल्प किमतीतील 7 टक्के वाटा उत्तर प्रदेशचा आहे. अरुणाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर असून, तिथे 188 पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत. त्यांची किंमत 3 लाख 17 हजार 310 कोटी आहे. या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किमतीत 6.3 टक्के आहे. 

तमिळनाडू चौथ्या आणि गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तमिळनाडूचा वाटा 6.2 टक्के, गुजरातचा वाटा 5.7 टक्के आहे. या राज्यांच्या खालोखाल अनुक्रमे कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.

Web Title: maharashtra news Infrastructure