कर्जाचा डोंगर वाढता वाढे...

कर्जाचा डोंगर वाढता वाढे...

नागपूर- राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे सुरू असल्याच्या अजित पवार यांच्या आरोपानंतरही पुरवणी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्ज काढण्यात येणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सूचित केले. विशेष म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल २६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. 

अजित पवार यांनी, सुमारे सव्वाचार लाख हजार कोटींचे कर्ज राज्य सरकारने घेतल्याचे सांगून राज्य दिवाळखोरीत जात असल्याचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा ‘जीडीपी’ लक्षात घेता कर्जाची रक्कम फार नसून चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही दिली होती. एवढेच नव्हे तर इतर राज्यांच्या तुलनेत ते कमी असून, आणखी कर्ज घेऊ शकतो इतकी ऐपत राज्याची असल्याचेही सांगितले होते. 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांनी गोंधळातच २६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. इतका निधी आणणार, असा प्रश्‍न विचारला असता दीपक केसरकर यांनी याकरिता कुठलीही करवाढ केली जाणार नाही, असे सांगताना आणखी कर्ज काढण्यात येईल, असे सूचित केले. त्यामुळे राज्यावरील कर्जाच्या डोंगरात आणखी भर पडणार असल्याचे सष्ट आहे. केसरकर म्हणाले, ‘२६ हजार ४०२ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत. यात १५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आहेत. त्याचप्रमाणे पीक विमा, सिंचनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी ठेवला आहे. सरकारला शेतकऱ्यांची काळजी असल्याने पुरवणी मागण्यांत सर्वाधिक निधीची तरतूद शेतकऱ्यांसाठी केली आहे. राज्यावर चार लाख कोटींच्यावर कर्ज असल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नव्याने कर लादण्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, की कोणत्याही प्रकारचा कर लावण्यात येणार नाही. महसुलात वाढ करण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे खर्चात काटकसर करण्यासाठी प्रत्येक विभागाला सूचना दिल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com