अपंगांसाठी नवीन धोरण लवकरच - बडोले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई - अपंगांचे विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी अपंगांसाठीचे सर्व समावेशक धोरण लवकरच तयार करण्यात येईल, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले. २००५च्या पूरग्रस्त अपंगांना संक्रमण शिबिरात घरे मिळावीत याबाबत तसेच अपंगांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

बडोले म्हणाले, की अपंगांना विविध सोयी-सुविधा देण्यासंदर्भात विविध विभागांचे अभियाप्राय घेऊन सर्व समावेशक असे धोरण प्रस्तावित असून येत्या दोन महिन्यांत हे धोरण जाहीर करण्यात येईल. पूरग्रस्त अपंगांना ‘एमएमआरडी’कडे असलेली घरे उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येईल. तसेच वडाळा टर्मिनलची शासकीय जागा ‘म्हाडा’कडे हस्तांतरित करण्याबाबतची मागणीही करण्यात येईल. मुंबईत अपंगांना देण्यात आलेले; परंतु सध्या बंद असलेल्या टेलिफोन बूथवर अपंगांना अन्य व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, मृत अपंग व्यक्तीच्या नावे असलेले बूथ अन्य अपंग व्यक्तीला देण्यात यावा, अशा विविध मागण्या संबंधित संघटनांच्या प्रतिनिधींनी केल्या.