मुख्यमंत्र्यांची शालीनता, विनम्रता गहाळ झाली 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

मुंबई - ""राजकीय नेतृत्वाकरिता शालीनता आणि विनम्रता हे अतिशय मौल्यवान ऐवज व अलंकार असतात. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा भार सांभाळताना हे ऐवज गहाळ झाल्याचे दिसते. यातून मुख्यमंत्र्यांचे केवढे मोठे नुकसान झाले आहे याची जाणीव कदाचित त्यांना नसावी. लवकरात लवकर या ऐवजांचा शोध मुख्यमंत्र्यांनी सुरू केला, तर त्याचा त्यांनाच लाभ होईल आणि महाराष्ट्राची इभ्रत वाचेल,'' अशी कठोर टीका कॉंग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी केली. 

या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना सावंत म्हणाले, की फडणवीस यांनी शेतकरी आंदोलनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुकाणू समितीला जिवाणू समिती आणि आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही म्हटले. या अगोदरही मुख्यमंत्र्यांनी संघर्ष यात्रा काढली म्हणून विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज म्हटले होते. मीरा भाईंदर महापालिका प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष संस्थेचे दलाल आहेत या शब्दांत संभावना केली. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना "दुकानदार' म्हणून हिणवले आहे. लोकशाहीमध्ये विरोधक आणि प्रसारमाध्यमे यांची अवहेलना करतानाच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सामान्य शेतकरी या सर्वांबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी हीन भाषेचा वापर केल्याची खंत आहे. शेतकरी कर्जमाफीवरून सरकार उघडे पडल्याने मुख्यमंत्र्यांचा त्रागा वाढत चालला आहे आणि तोल ढासळत चाललेला आहे, अशी टीका त्यांनी या वेळी केली.