साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीचा निर्णय लांबणीवर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई - साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक न घेता त्याची निवड करण्यात यावी आणि 25 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात असलेल्या संस्थांना "सहयोगी संस्था' असा दर्जा देणे, हे निर्णय पुन्हा लांबणीवर पडले आहेत. 

अध्यक्षांची निवड करणे आणि संस्थांना सहयोगी दर्जा देणे हे प्रस्ताव साहित्य महामंडळाच्या घटना दुरुस्ती सभेने मंजूर केले. घटना दुरुस्ती समितीने संमत केलेल्या ठरावांना साहित्य महामंडळाच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी द्यावी, असा संकेत आहे; परंतु गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत तो झुगारण्यात आला. महामंडळाच्या इतिहासात हे प्रथमच घडल्याचे सांगण्यात येते. 

साहित्य क्षेत्रातील संस्थांना सहयोगी संस्थांचा दर्जा द्यावा आणि साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाद होत असल्याने अध्यक्षाची निवड करावी, असे प्रस्ताव विदर्भ साहित्य संघाने घटना दुरुस्ती समितीकडे दिले होते. घटना दुरुस्ती समितीने त्यांना मान्यताही दिली; मात्र सर्वसाधारण सभेत इतर घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी हे प्रस्ताव फेटाळले. घटना दुरुस्ती समितीचा निर्णय सर्वसाधारण सभेला मान्य करावा लागतो; मात्र महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच तो अमान्य करण्यात आला, अशी माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली. 

अध्यक्षांची निवड आणि संस्थांना "सहयोगी' दर्जा या दोन्ही प्रस्तावांवर सर्वसाधारण सभेत निर्णय होऊ न शकल्याने सभा स्थगित करण्यात आली. ती लवकरच पुन्हा घेण्यात येईल. या सभेत घटक संस्थांना मते मांडण्याचा अधिकार आहे. 
- श्रीपाद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ अध्यक्ष