नफा दहा रुपये अन्‌ जीएसटी २८ रुपये 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

सोलापूर - लॉटरीने अनेकांना लखपती, करोडपती बनविले, त्याच लॉटरी तिकीट विक्रीच्या व्यवसायाचे भविष्य आता अंधकारमय झाले आहे. नव्याने आलेल्या वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) राज्यातील लॉटरी विक्रेते व कामगार यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लॉटरी विक्रीतून दहा रुपयांचा नफा विक्रेत्यांना मिळतो. सरकारने तिकिटाच्या किमान विक्री किमतीवर जीएसटी लावल्याने नफा दहा रुपये आणि कर २८ रुपये अशीच विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्र राज्य लॉटरी व ऑनलाइन लॉटरी विक्रेता विकास संघाच्या वतीने उद्या (सोमवार) आझाद मैदानावर महाआंदोलन करण्यात येणार आहे. या महाआंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सोलापुरात नुकतीच बैठक झाली आहे. महाराष्ट्र सरकारची लॉटरी राज्यात विकल्यास १२ टक्के कर आणि अन्य राज्यात विकल्यास २८ टक्के कर असा जीएसटीमधील विरोधाभास हास्यास्पद असल्याची माहिती लॉटरी विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष शहाजी चव्हाण यांनी या वेळी बोलताना सांगितले. लॉटरी विक्रेते व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगारांची रोजी रोटी वाचविण्यासाठी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारला वारंवार निवेदने देण्यात आली आहेत.