सोनोग्राफी मशिन खरेदीत पालिकेला "क्‍लीन चिट' 

यशपाल सोनकांबळे 
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई - पुणे महापालिकेच्या पंधरा रुग्णालयांमध्ये बसविण्यात आलेल्या 16 सोनोग्राफी मशिन बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करण्यात आल्या; परंतु यामध्ये पाच मशिनसह अन्य यंत्रसामग्रीच्या 1 कोटी 55 लाख रुपयांच्या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप चुकीचा असून, सर्व व्यवहार निविदा प्रक्रियेद्वारे झाला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तरामध्ये स्पष्ट केले. 

या संदर्भात माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार हनुमंत डोळस, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि एरंडोलचे आमदार डॉ. अण्णासाहेब पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित करीत, या सोनोग्राफी मशिन खरेदीच्या चौकशीची मागणी केली. तसेच पूर्वीच्या मशिनचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसताना, पुन्हा यंदाच्या वर्षी 70 लाख रुपये खर्च करून पाच मशिन खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली. 

"महापालिकेच्या पंधरा रुग्णालयांत 16 सोनोग्राफी मशिनसह इलॅस्टीग्राफी, प्रोब, संगणक, प्रिंटर आणि अन्य यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. आवश्‍यकतेनुसार मशिन खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या आहेत. त्या बाजारभावाप्रमाणे खरेदी केल्या आहेत. यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सजग नागरिक मंचाकडून करण्यात आला होता. त्याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन महापालिकेकडून माहिती घेतली. ही खरेदी बाजारभावानुसार तसेच निविदा प्रक्रियेद्वारे केली आहे. म्हणून कुठल्याही चौकशीची गरज नाही,' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.