दहावीचा निकाल 88.74%; मुलींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल

संतोष शाळीग्राम
मंगळवार, 13 जून 2017

विभागनिहाय निकाल टक्केवारी -
कोकण - 96.18
कोल्हापूर - 93.59
पुणे - 91.95 
नागपूर - 83.67
औरंगाबाद - 88.15
अमरावती - 84.35
मुंबई - 90.09
नाशिक - 87.76
लातूर - 85.22 
नगर - 90.09
सोलापूर - 92.47

पुणे - राज्य बोर्डचा दहावीचा (एसएससी) निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला असून, राज्याचा 88.74 टक्के निकाल लागला आहे. मुलींनी यंदाही बाजी मारली असून, 91.46 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गुणपत्रिका 24 जून सकाळी अकरा वाजता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून घेण्यात येणार आहे.

आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार असून, त्यापूर्वी पत्रकार परिषद घेत राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यभरातून तब्बल 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. कोकण विभागाने यंदाही निकालात अव्वल स्थान पटकाविले आहे. 

विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच एसएमएस वर विषयनिहाय गुण पाहाता येणार आहे. तर, बुधवारी (ता.14) गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी अर्ज करता येणार आहे. निकाल उशिरा नाही. परीक्षा महापालिका निवडणुकांमुळे सात दिवस उशिरा सुरु झाली. तेवढ्याच दिवसांनी निकाल लांबला. गेल्या वर्षी 1 मार्चपासून सुरु झाली. त्याचा निकाल सहा जून रोजी लागला होता, असे गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.

18 जुलैपासून फेरपरिक्षा
दहावीत अनुउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जूलैपासून घेण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची सुरवात 19 जून पासून होईल, अशी माहिती शिक्षण मंडळाचे सचिव के.बी.पाटील यांनी दिली.

विभागनिहाय निकाल टक्केवारी -
कोकण - 96.18
कोल्हापूर - 93.59
पुणे - 91.95 
नागपूर - 83.67
औरंगाबाद - 88.15
अमरावती - 84.35
मुंबई - 90.09
नाशिक - 87.76
लातूर - 85.22 
नगर - 90.09
सोलापूर - 92.47

निकाल येथे पाहता येणार
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.knowyourresult.com
www.rediff.com/exam
www.jagranjosh.com

बीएसएनएल मोबाईलवर - 67766 या क्रमांकावर MHSSC
(स्पेस)(बैठक क्रमांक)
आयडीया, व्होडाफोन,रिलायन्स,टाटा डोकोमा -58888111 या क्रमांकावर
MAH10(स्पेस) (बैठक क्रमांक)

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​