गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या गुन्ह्यांवर तटकरेंचे मौन

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या गुन्ह्यांवर तटकरेंचे मौन

नागपूर- गोसेखुर्द सिंचन प्रकल्प गैरव्यवहारात अधिकारी आणि कंत्राटदार कंपन्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवर माजी जलसंपदामंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘कायदेशीर प्रक्रिया’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे मंगळवारी सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आली. एकीकडे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे सिंचन गैरव्यवहारप्रकरणी लाचलुचपत विभागाने (एसीबी) नव्याने चार गुन्हे नोंदविले. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढला. त्याच दिवशी गुन्हे दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे का, अशी विचारणा केली असता तटकरे यांनी बोलण्यास नकार दिला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी हल्लाबोल आंदोलनाची माहिती देताना भाजपच्या मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीच्या कार्यकाळातील गैरव्यवहार बाहेर काढू, असा इशारा दिला होता. आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपदा खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. अजित पवार आणि सुनील तटकरे या खात्याचे मंत्री होते. अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याने गुन्हे दाखल करण्यात आल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. विशेष म्हणजे भाजपच्या एका आमदाराच्या कंपनीवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com