कोकणात आजही पावसाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

पुणे  - कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला असून, येत्या शुक्रवारी (ता. 22) कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर, मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस हजेरी लावेल, असेही खात्याने सांगितले. 

पुणे  - कोकण वगळता राज्याच्या बहुतांश भागात पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला असून, येत्या शुक्रवारी (ता. 22) कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच तर, मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस हजेरी लावेल, असेही खात्याने सांगितले. 

कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश भागाला गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाने झोडपले. मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर तसेच, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत होता. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात ओडिशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्याचा थेट परिणाम विदर्भावर झाला. तेथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. बंगालच्या उपसागरातील हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान 

खात्याने दिला आहे. तसेच, कोकणच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडत आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, कोकण-गोवा, झारखंड, बिहार, हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, ओडिशा आणि झारखंड येथे अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. 

उत्तर भारतातील मध्य प्रदेश, हिमालय, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम आणि आसाम, मेघालय आणि मध्य भारतातील कोकण-गोवा येथे मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. सध्या मध्य प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा असून, त्याचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याचा अंदाज आहे. बिकानेर, अजमेर या भागातही कमी दाबाचा पट्टा असून, तो बंगालच्या उपसागरापर्यंत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news weather rain konkan