राज्यातील तुरुंगांमध्ये आता महिला खबऱ्यांचे नेटवर्क 

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 26 जून 2017

मुंबई - भायखळा मध्यवर्ती तुरुंगात महिला कैद्याच्या मृत्यूनंतर महिला कैद्यांनी तोडफोड केली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तुरुंगांमध्ये महिला कैदी खबऱ्यांचे जाळे उभारण्याचा निर्णय तुरुंग विभागाने घेतला आहे. यामार्फत आक्रमक होणाऱ्या कैद्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. 

तुरुंग विभागाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती तुरुंग आहेत. मुंबई आणि पुण्यात महिलांसाठी स्वतंत्र आणि अकोल्यात खुले तुरुंग आहे. भायखळा तुरुंगात 300 महिला कैदी आहेत. या तुरुंगांत शुक्रवारी मंजूळा शेट्ये या कैद्याचा मृत्यू झाल्यानंतर महिला कैद्यांनी तोडफोड केली. तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर विटा फेकल्या. तेथील कपडे, चादरी तसेच संगणक आणि नोंदवह्या तसेच जुनी कागदपत्रे जाळली. 

या कैदी संतप्त का झाल्या, याचा शोध तुरुंग विभाग घेत आहे. तांत्रिक कारणामुळे तुरुंगातील बराकींजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येत नाहीत. तुरुंगात कैद्यांचे नेहमीच किरकोळ वाद होतात. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या कैद्यांना वेगळ्या बराकींमध्ये ठेवण्याचाही तुरुंग विभागाचा विचार आहे. भायखळा तुरुंगातील हा नेमका प्रकार कसा घडला. कैद्यांना कोणी चिथावणी दिली, याची चौकशी करून या घटनेचा अहवाल उपमहानिरीक्षक (तुरुंग) लवकरच सादर केला जाणार आहे.

टॅग्स