गाव विकासाच्या वाटेवर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

गावामध्ये महत्त्वाचं पद, नेतेपद मिळाल्यानंतर त्याचा उपयोग गावाच्या सर्वंकष विकासासाठी, पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी करणाऱ्या अनेक महिला राज्यात आहेत. ‘सकाळ’च्या ‘तनिष्का’ व्यासपीठावरूनही अनेक जणींनी भरीव कामगिरी करत गावाचा कायापालट केला आहे. आपल्या गावाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या महिलांच्या या यशोगाथा...

समान पाणीवाटपाची सुरवात  - कु. योगिता दिगंबर गायकवाड
उल्लेखनीय कार्य 

रहिवासी दाखले, ‘नमुना आठ’ याद्वारे नागरिकांत कर वसुलीबाबत जाणीव करून दिली आणि नागरिकांना कर भरण्यास प्रोत्साहन दिले. दाखले न दिल्यास लोकांना राग येतो आणि विरोध करू लागतात, तरीही तो विरोध पत्करून हे काम केले. आज वसुली ६० टक्के आहे. 
पेरुल (समान पाणीवाटप) योजना राबविणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत.
ग्रामपंचायतीचा विकास निधी इतरत्र खर्च न करता तो वॉर्डांत विभागून ५ रुपये प्रतिस्क्वेअर फुटाप्रमाणे वेगळा केला जातो आणि त्याच वार्डामध्ये त्याच कामांसाठी तो खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षांत अशा प्रकारे ३२ लाख रुपयांची कामे गावात केली. अनेक ग्रामपंचायतींनी १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून एलईडी दिवे आणि इतर कामे केली. शीतलवाडीत पाणीपुरवठ्यासाठी ११ लाख रुपयांचे जलवाहिनीचे काम केले. 
१४ गावांची नळ योजनेची थकीत बिले भरली. अध्यक्ष म्हणून ही योजना चालवत आहे. आगामी एक वर्षात अंगणवाड्या, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल केले, आयएसओ मानांकन प्राप्त करून दिले. 
नीती आयोगाच्या बैठकीला जाणारी राज्यातील पहिली महिला युवा सरपंच. सरपंच थेट जनतेतून निवडावा, ही मागणी पूर्ण झाली. 
दुसरी मागणी सरपंचांचे मानधन वाढवून १० हजार रुपयांपर्यंत केले पाहिजे, जेणेकरून गरीब माणूस निवडून आल्यास काम करणे सोपे होईल. ग्रामपंचायतीला तांत्रिक मनुष्यबळ स्वतंत्र असले पाहिजे, दोन तीन ग्रामपंचायत मिळून एक अभियंता द्यावा, १० ते १५ लाख रुपयांच्या बांधकामाचा अधिकार ग्रामपंचायतीला असावा, त्याच्या पुढील रकमेचे काम निविदा काढून करावे या मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. 

---------------------------------

विकासाची ‘अस्मिता’  - रोहिणी लवांडे 
उल्लेखनीय कार्य : 
निर्मलग्राम, विकासरत्न हे दोन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाले. 
जिल्हा परिषदेचा ‘अस्मिता ग्राम पुरस्कार’ही प्राप्त
महाराष्ट्रदिनी पारेवाडीला दहा लाख रुपयांचा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार मिळाला. 
सावित्रीबाई फुले पुरस्कार, सकाळ गौरव पुरस्कार, वूमन वंडर पुरस्कार प्राप्त. 
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभाग
गावातील शाळा आदर्श आणि डिजिटल केली. 
अंगणवाडी आदर्श केली. 
गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यश
मीटरद्वारे नळातून पाणी देण्यास प्रारंभ. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची सवय गावाला लागली. 
संपूर्ण गाव तनिष्कामय केले.
सकाळ रिलीफ फंडातून नदीपात्रातील गाळ काढला. 
तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून गावामध्ये रक्तदान, नेत्र व सर्व रोगनिदान शिबिरांचे आयोजन.

---------------------------------

‘ओढाजोड’ प्रकल्पाची मुहूर्तमेढ  - अल्पना प्रताप यादव
उल्लेखनीय कार्य : 

२०००मध्ये गुळुंब विकास सेवा सोसायटीच्या संचालिका. 
२००५मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. समाजाभिमुख आणि निःस्वार्थी कार्याची पोचपावती म्हणून ग्रामस्थांनी त्यांना पुन्हा ग्रामपंचायतीत पाठविले. 
२६ ऑगस्ट २०१० रोजी सरपंचपदी बिनविरोध निवड.
पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकसहभागातून गुळुंब-चांदक ओढाजोड प्रकल्प राबविला. राज्यातील अनेक गावांना तो दिशादर्शक ठरला आहे. 
तनिष्कांमुळे ओढाजोड प्रकल्पाला बळ मिळाले असून, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. 
तनिष्कांच्या मागणीनुसार ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या माध्यमातून तलावातील गाळ काढला. त्यामुळे मुबलक पाणीसाठा झाला आहे. 
गावात पक्‍की गटारे, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची सोय, जवाहर व मागासवर्गीय कल्याण निधीतून भांडीवाटप. 
ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, तंटामुक्‍त गाव, दारूबंदी अशा योजना राबवितानाच महिलांच्या आरोग्याच्या व अन्य समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य. 
 बचत गटांचे सक्षमीकरण, उद्योजकता शिबिर, संगणक साक्षरता व आरोग्य शिबिरे.

(संकलन : अतुल मेहेरे, संजय शिंदे, सुहास देशपांडे)

Web Title: maharashtra news Women's success stories