सीमाभागातून मोर्चात लाखोंचा सहभाग

निखिल पंडीतराव, संभाजी गंडमाळे - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगाव, निपाणी, धारवाड या भागातून लाखोंच्या संख्येने नागरिक मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगाव, निपाणी, धारवाड या भागातून लाखोंच्या संख्येने नागरिक मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे होत आहेत. आज (शनिवा) कोल्हापुरात मोर्चा होत असून हा मोर्चा "न भूतो न भविष्यति‘ असा असेल, अशी वातावरणनिर्मिती गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून होत आहे. मोर्चात कोल्हापूरसह सीमाभागातील लाखो लोक सहभागी झाले आहेत. "ना नेता, ना घोषणा‘ हे राज्यभरातील मोर्चांचे स्वरूप कोल्हापुरातही कायम आहे. 

कर्नाटक सीमाभागातील मराठा समाज शेकडोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चासाठी कोल्हापुरात आला आहे. सकल मराठा समाजाच्या मागण्यांसोबतच सीमा भाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आमदार अरविंद पाटील, आमदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरूण कार्यकर्ते, महिला मोर्चात सहभागी झाले आहेत. एक हजाराहून अधिक वाहने बेळगावसह कर्नाटकातील अन्य भागातून कोल्हापुरात दाखल झाली आहेत.