सहा टक्के आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती; मुख्यमंत्र्यांची नोकरशहांशी चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

शिष्यवृत्तीसंदर्भातील पूर्वी घेतलेल्या निर्णय प्रत्यक्षात यायला वेळ लागत आहे. तशी दिरंगाई करून चालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नोकरशहांना झापल्याचे समजते.

मुंबई : ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जशी शिष्यवृत्ती आहे, त्याचप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार आहे. तसेच सहा टक्के आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती तयार करणार आहे. रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.

शिष्यवृत्तीसंदर्भातील पूर्वी घेतलेल्या निर्णय प्रत्यक्षात यायला वेळ लागत आहे. तशी दिरंगाई करून चालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नोकरशहांना झापल्याचे समजते.

मराठा क्रांती मूक मोर्चामुळे विधानसभेचे कामकाज बंद करण्यात आले असून, सर्व आमदार मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. दोन्ही बाजूंच्या मराठा आमदारांनी आरक्षणाची मागणी केली आहे. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. दहा मिनिटे, मग अर्धा तास आणि तीन पर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. रणजित पाटील मोर्चाकडे निघाले आहेत. मोर्चेकरी आणि सरकारमध्ये दुपारी चर्चा होण्याची शक्यता आहे.