मेट्रोला चालना; ३७ लाख रोजगाराचे उद्दिष्ट

मेट्रोला चालना; ३७ लाख रोजगाराचे उद्दिष्ट

मुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे. 

सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गासाठी ६४ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. येत्या एप्रिल महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू होणे अपेक्षित असल्याचे सरकारने अर्थसंकल्पात स्पष्ट केले. 

राज्यातील रस्तेविकासासाठी १० हजार ८२८ कोटींची तरतूद करतानाच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येत्या वर्षात राज्यात सात हजार किलोमीटरचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. त्यासाठी दोन हजार २५५ कोटींची तरतूद केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे सुधारणा, मेट्रोचे जाळे, एमटीएचएल अर्थात शिवडी-न्हावा-शेवा सागरी सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना प्राधान्य दिले आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्रात १२ लाख १० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यातून ३७ लाख रोजगार उपलब्ध होईल. हस्तकला उद्योग विकासासाठी चार कोटी; तर आगामी वर्षात सामूहिक उद्योगवाढीसाठी दोन हजार ६५० कोटी प्रस्तावित आहेत. राज्यातील पोलिस दलाच्या विकासासाठी १३ हजार ३८५ कोटींची तरतूद केली आहे. ग्रामीण भागातील सांडपाणी प्रक्रियेसाठी ३३५ कोटी; तसेच १५२ शहरांत घनव्यवस्थापन योजनांना मंजुरी दिली आहे. मिहान प्रकल्पाला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद केल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  स्पष्ट केले.

महत्त्वाच्या घोषणा
  राज्यात सहा कौशल्य विद्यापीठांची स्थापना होणार.
 उद्योगाच्या समायिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील उद्योगांना २६५० कोटींची तरतूद.
 परदेशात रोजगार किंवा प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या तरुणांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचा निर्णय.
 सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानासाठी ९०० कोटी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com