शिवनेरीवरील कडेलोट प्रवेशद्वारास तडा

शिवनेरीवरील कडेलोट प्रवेशद्वारास तडा

जुन्नर - ऐतिहासिक शिवनेरीवरील कडेलोट कड्याच्या टोकाकडे जाण्यासाठी असलेल्या प्रवेशद्वाराच्या दगडी चौकटीच्या वरील बाजूस असणाऱ्या एकसंध दगडास मोठी तडा गेली आहे. त्यामुळे या वैभवशाली वास्तुशिल्पास भविष्यात धोका पोचण्याची भीती शिवप्रेमींकडून व्यक्‍त होत आहे. याबाबत येथील शिवजन्मभूमी संवर्धन समितीने पुरातत्त्व विभागास गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. 

शिवजन्मस्थानाच्या पुढे शिवनेरी गड निमुळता होत जातो. उत्तरेकडील निमुळत्या टोकास कडेलोट कडा असे नाव आहे. येथे वाऱ्याचा वेग खूप असतो. खाली खोल दरी व पूर्व व पश्‍चिमेकडील पंचवीस किलोमीटरच्या परिसराचे विहंगम दृश्‍य येथून पाहावयास मिळत असल्याने कडेलोट टोक हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.  

शिवजन्मभूमी संवर्धन समितीकडून दुरुस्तीची मागणी
शिवनेरीवरील ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्था ही सचित्र मालिका ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. पूर्वी येथे कैद्यांचा कडेलोट केला जात असे. त्या ‘कडेलोट’चा कडेलोट होणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र पुरातत्त्व विभागाने सन २००७ मध्ये या ठिकाणचे काम पूर्ण करून प्रवेशद्वार तसेच संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केले. पुरातत्त्व विभागाने त्यांच्या लौकिकाला साजेल असेच काम केले असले, तरी दहा वर्षांत ऊन, वारा व पावसाचा परिणाम झाल्याने दगडाला चिरा गेल्या असण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवी काजळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com