मराठी शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - मराठी राजभाषा दिनानिमित्त मोठमोठे सोहळे आयोजित केले जात असले तरीही दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती आहे. मुंबईतील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांतील मराठीच्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्‍यात आल्या आहेत. विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांना "जादा' दाखविणे किंवा नोटिसा देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. राज्य शासनाच्या नाकर्त्या धोरणामुळे हे होत असल्याची टीका शिक्षकांकडून होत आहे. 

सोमय्या कॉलेज, हिंदुजा कॉलेज, खार येथील कन्या महाविद्यालय, विक्रोळी विद्यामंदिर अशा काही महाविद्यालयांत मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याच कमी झाल्याने काही शिक्षकांना "जादा' दाखवून दुसऱ्या संस्थांमध्ये रुजू होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कन्या महाविद्यालयातील अशा एका शिक्षिकेला या महिन्याचा पगारही मिळालेला नाही. मुंबईतील हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी महाविद्यालये सोडल्यास बहुतांश महाविद्यालयांत मराठीची स्थिती गंभीर आहे. मराठी विषयाला दिलेल्या आयटी, परदेशी भाषांच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांनी मराठीकडे पाठ फिरवली आहे. राजभाषा मराठीच्या या अवस्थेमुळे राज्यात मराठी सक्तीची का करू नये, असा प्रश्‍न मराठी भाषातज्ज्ञांकडून केला जात आहे. 

मराठीसाठी अनेक पर्याय विद्यार्थ्यांसमोर असून, त्या विषयांत गुण वाढण्याची संधी असते, त्यासाठी मराठीला बगल दिली जाते; मात्र मराठी वाचवण्यासाठी विद्यार्थी कमी असले तरीही मराठी शिकवली गेली पाहिजे, असे अल्पसंख्याक भाषांसाठीचे धोरण आता मराठीसाठी वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकारच्या उदासीन भूमिकेचा फटका मराठीच्या शिक्षकांना बसत आहे. पुढील काळात कोणे एकेकाळी मराठी भाषा शिकवली जात होती, असे म्हणण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. 
- अनिल देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षक महासंघ 

महाराष्ट्र

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून...

05.12 AM

मुंबई - गणेशोत्सवानिमित्त शिक्षकांना ऑगस्टचा पगार लवकर देण्याच्या हालचाली शिक्षण विभागात सुरू आहेत.  शिक्षकांचा पगार...

04.12 AM

मुंबई - अभिनेता शाहरुख खानने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात उपस्थित राहण्यास चार आठवड्यांनी मुदत वाढवून मागितली आहे....

03.12 AM