मायणीच्या वैद्यकीय प्रवेशप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्‍यातील मायणी येथील आयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशातील अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्‍यात आली असून, या 97 विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांना अन्य महाविद्यालयात सामावून घेण्यात यावे. तसेच महाविद्यालय प्रशासनाच्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. यासंदर्भात उद्या (ता. 10) सर्व संबंधितांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करून त्वरित मार्ग काढण्याचे निर्देश उपसभापतींनी सरकारला दिले. 

आयएमएसआर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अनियमितता, महाविद्यालयात पायाभूत सुविधांचा अभाव, आवश्‍यक अटींची पूर्तता करण्यात आलेले अपयश अशा कारणांमुळे 97 विद्यार्थ्यांचे प्रवेश अनियमित ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्‍यात आली आहे. संस्थेच्या चुकांचा फटका आपल्याला बसू नये व न्याय मिळावा, यासाठी हे विद्यार्थी 51 दिवसांपासून उपोषणात बसले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भातील मुद्दा मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता.

Web Title: Medical admission case in mayni