#MilkAgitation दूधप्रश्‍नी आज ‘चक्का जाम’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

पुणे - दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान देण्याबाबत सरकार निर्णय घेत नसल्याचे पाहून खासदार राजू शेट्टी यांनी आज (ता. १९) राज्यभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राज्यभरात मुलाबाळांसह जनावरे घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. तर तिसऱ्या दिवशीही राज्यात दूध आंदोलनाची धग कायम होती. दूधदराबाबत कोणताच तोडगा न निघाल्याने मुख्यमंत्री आज पुन्हा बैठक घेणार आहेत. दुसरीकडे आंदोलनामुळे मुंबई, पुण्याची दूधकोंडी होण्यास सुरवात झाली आहे. 

‘‘आजचा राज्यव्यापी चक्का जाम शेतकरी उत्स्फूर्तपणे करीत आहेत. कारण, माझे ८ हजार कार्यकर्ते पोलिसांनी पकडून ठेवले आहेत. आजच्या आंदोलनानंतर आम्ही पुन्हा पुढची दिशा जाहीर करू. आंदोलनाची तीव्रता वाढविण्याची आमची तयारी आहे. कोणी मध्यस्थीला पाठवले तर चर्चा करणार का, मला निरोप आला आहे. मी देखील तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दाम दिलेच पाहिजे यावर मी ठाम आहे,’’ असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्याच्या विविध भागांमध्ये टॅंकरफोड आंदोलन करून पुणे, मुंबईकडे जाणारे ५० टक्के दूध रोखण्यात स्वाभिमानी यशस्वी झाली. खासदार शेट्टी यांनी मुंबई- अहमदाबाद हायवेवरही ठाण मांडल्याने मुंबईची अधिकच कोंडी झाली.

दुसरा पर्याय दिला
सरकारसमोर आम्ही दुसरा पर्यायदेखील ठेवत आहोत. पावडर प्लांटचालकांनी शेतकऱ्यांचे दूध २५ रुपये रोखीत खरेदी केल्यास आम्ही मान्य करू. पावडरवाल्यांना सरकारने काय द्यायचे ते द्यावे; पण शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर प्लांटवाल्याने दिल्यास इतर संघ आपोआप २७ ते २९ रुपये दर आम्हाला देतील. आता काय करायचे ते सरकारने ठरवावे, असे शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: #MilkAgitation chakka jam raju shetty