हिंदूंना सरकारने बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण द्यावं; मनसेची मागणी

काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण हिंसाचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.
Kashmir  Valley
Kashmir ValleySakal

जम्मू काश्मीरमध्ये सध्या टार्गेट किलींगमुळे दहशत पसरली आहे. एका महिन्यातच ४० नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. त्यामुळे आता या भागातून अनेक नागरिकांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान यावरून सर्वच पक्षातल्या लोकांनी निषेध व्यक्त केला आहे. मनसेनेही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. (Sandeep Deshpande on kashmir valley)

मनसे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी ट्वीट करत या हत्यांचा निषेध केला आहे. संदीप देशपांडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत, ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसंच बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण केंद्र सरकारनं दिलं पाहिजे".

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात ४० नागरिकांची हत्या केली आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक कर्मचाऱ्याचीही हत्या केली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्लीत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासोबत काश्मीर खोऱ्यातल्या सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला गृह मंत्रालय, लष्कर आणि राज्य सुरक्षा यंत्रणांचे उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com