आणखी 25 जणांनी शस्त्रे मागविल्याचे निष्पन्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

शहरातील आणखी पंचवीस जणांनी ऑनलाइन शस्त्रे मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या तीन महिन्यांचा इन्स्टाकार्ट व फ्लिपकार्टकडून डाटा मागवला होता. यातून ही माहिती समोर आली.

औरंगाबाद : शहरातील आणखी पंचवीस जणांनी ऑनलाइन शस्त्रे मागविल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या तीन महिन्यांचा इन्स्टाकार्ट व फ्लिपकार्टकडून डाटा मागवला होता. यातून ही माहिती समोर आली. हे संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने नागेश्वरवाडी व जयभवानीनगरातील इन्स्टाकार्ट या फ्लिपकार्टची को-पार्टनर असलेल्या कुरिअर कंपनीवर 28 मे रोजी रात्री छापे टाकले होते. दरम्यान, शस्त्रांचे औरंगाबाद ते भिवंडी कनेक्‍शन समोर आल्यानंतर पोलिसांची दोन पथके भिवंडीत गेली. तेथील इन्स्टाकार्टच्या कार्यालयात छापे घालून झडती घेतली. 

Web Title: More than 25 people have called for arms