कळसुबाई शिखरावर एमटीडीसीचे ध्वजवंदन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - प्रजासत्ताक दिन पर्यटनस्थळी साजरा करण्याकडे कल वाढत असताना येत्या प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर "एमटीडीसी' ध्वजवंदन करणार आहे. एमटीडीसीच्या वतीने प्रथमच असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

साधारण 5 हजार 400 फूट उंच असलेल्या कळसुबाई शिखरावर दोन दिवसांच्या ट्रेकचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जानेवारीला दुपारी 2 वाजता दादर व पुणे येथून या ट्रेकला सुरवात होईल. 26 जानेवारीला पहाटे सात वाजता ध्वजवंदन होईल. येथून ट्रेकरना भंडारदरा धरणाचे बॅकवॉटर; तसेच हरिहरगड, बहुला, अंजनेरी, घारगड, त्रिंगळवाडी आणि कावनाई या ठिकाणांचेही विहंगम दर्शन घडेल. पायथ्याच्या गावात जेवणाची सोय करण्यात येईल. अनुभवी ट्रेकिंग गाईडची मदत घेतली जाणार आहे. डीलक्‍स पॅकेजसाठी तीन हजार 917 आणि स्टॅण्डर्ड पॅकेजसाठी तीन हजार 557 रुपये घेतले जातील.

महाराष्ट्र

पाच वर्षांचा कालावधी; 470 कोटींचा निधी मुंबई: खून, बलात्कार, दरोडा, अनैतिक मानवी वाहतूक, हुंडाबळी, सायबर क्राईम आदी...

03.03 AM

मुंबई: प्रशासनाच्या उदासीनतेमुळे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा बोजवारा उडाला आहे. या योजनेअंतर्गत दोन वर्षांत 20 हजारांचे अनुदान...

02.03 AM

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्नीकडून गैरवापर मुंबई: राज्य सरकारच्या सह्याद्री राज्य अतिथिगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट...

01.24 AM