अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुंबई - महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते गुरुवारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मुंबई - महाराष्ट्रातील तीन अंगणवाडी सेविकांना उल्लेखनीय योगदानासाठी केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते गुरुवारी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोपालपूर येथील केंद्राच्या चंद्रकला झुरमुरे, परभणी जिल्ह्यातील पडेगाव (ता. गंगाखेड) अंगणवाडी केंद्राच्या लताबाई वांईगडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पैंडाखले (ता. शाहूवाडी) अंगणवाडी केंद्राच्या सेविका चंद्रकला चव्हाण यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 25 हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रवासी भारतीय भवन येथे महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री कृष्णाराज, सचिव राकेश श्रीवास्तव, अपर सचिव अजय टिक्री उपस्थित होते.