पावसाची जूनमध्ये दमदार खेळी

सिद्धेश्‍वर डुकरे
शनिवार, 8 जुलै 2017

राज्यातील धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट
मुंबई - यंदा राज्यात वेळेवर आलेल्या पावसाने जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मोठ्या, मध्यम आणि छोट्या धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये तो 12 टक्‍के होता, तर यंदा सरासरी 24 टक्के आहे.

सध्या राज्यातील मोठी धरणे जून महिन्यात 24 टक्‍के, मध्यम धरणे 27 टक्‍के आणि लहान धरणे 21 टक्‍के भरली आहेत. कोकणातील धरणांमध्ये गेल्या वर्षी 40 टक्‍के जलसाठा होता. यंदा कोकणातील सर्व धरणे 60 टक्‍के भरली आहेत. मराठवाड्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षी जूनमध्ये केवळ एक टक्‍का पाणीसाठा होता. यंदा तो 18 टक्‍के आहे. यंदा जूनमध्ये सर्वांत कमी पाऊस नागपूर महसुली विभागात पडला.
जूनमध्ये पडलेल्या पावसाने राज्यातील शेतकरी सुखावला आहे. त्याने सरासरी 40 टक्‍के पेरण्या केल्या आहेत. सध्या पावसाने उसंत घेतली असल्याने शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले आहेत. पाऊस लांबला तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याचा धोका आहे.

जूनमधील पाणीसाठा
प्रकल्प...यंदा...गेल्या वर्षी (टक्‍के)

मोठी धरणे.......23.72.......11.72
मध्यम धरणे.......26.89.........18.95
छोटी धरणे.......20.51.......7.91
सरासरी......23.65.....12.09